११/०५/२०१६
आला पावसाळा
आला पावसाळा
पडे अंगणात सडा
पारिजातकाचा वेडा
पुन्हा सुगंध दाटला
आला पावसाळा
ओंजळ थेंबानी हि भरा
भरल्या ओंजळीतून वाही
पुन्हा आनदाचा झरा
आला पावसाळा
झाला विजांचा कडाडा
थकल्या जीवास हा देई
पुन्हा मायेचा गारवा
आला पावसाळा
नव्या स्वप्नांना उजाळा
सुकल्या झाडांना फुलला
पुन्हा वसंत हिरवा
पारिजातक
(अमिता पाटील)
११/०५/२०१६
(*All rights are reserve)
(*All rights are reserve)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा