सोमवार, २४ ऑगस्ट, २०१५

ओढ....



ओढ


किनारा पायाखालचा सुटवेना,
तरी समुद्र तळाची ओढ मनातून जायीना...

पाणावलेल्या डोळ्यातून साहस कधी हरवलेच
तरी वेड्या स्वप्नाची ओढ मनातून जायीना...

भाराने कर्तव्याच्या पंख झालेत जड
तरी आसमंतात उड्डाणाची ओढ मनातून जायीना...

खूप विचार करूनही अर्थ जीवनाचा कळेचना
तरी जगण्याची ओढ मनातून जायीना...


पारिजातक
(अमिता पाटील)
२०/८/२०१५
(*All rights are reserve) 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा